लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. Read More
Laxman Hake Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, जरांगे निवडणूक लढवणार नाहीत, ते पाच उमेदवार देऊ शकत नाही, असे लक्ष्मण हाके म्हटले आहे. ...
laxman hake Maharashtra Vidhan Sabha Election : मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी बाह्या खोचल्या आहेत. रोहित पवार, रोहित पाटील, राजेश टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार, अशी घोषणा लक्ष्मण हाकेंनी केल ...
Laxman Hake News : काल रात्री पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी आता हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ...
Laxman Hake News: आज ओबीसी समाजातील नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये मद्यप्राशन करून काही मराठा आंदोलकांना शिविगाळ केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून, लक्ष्मण हाके यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ...