लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. Read More
दिल्लीत काँग्रेस 70 पैकी 66 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर राजदला चार जागा सोडणार आहे. मात्र यावर अद्याप उभय पक्षांचे एकमत झाले नाही. या संदर्भात शनिवारी उभय पक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. ...
कर्नाटकपूर्वी भाजपने बिहारमध्ये देखील लालू प्रसाद यादव यांच्या राजदला धक्का देत सत्तेतून बाहेर केले होते. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रावर भाजपची नजर आहे. ...
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लालू यांच्या वतीने त्यांचे पुत्र आणि विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी नामांकन दाखल केले. अध्यक्षपदासाठी लालू यांचा एकच अर्ज मिळाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
याआधी रधुवंश सिंह यांनी असाच दावा केला होता. भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांचं अस्तित्व संपविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यामुळे राजद सोबत जाण्यास नितीश यांची हरकत नाही, असंही त्यांनी नमूद केले होते. ...
तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यात लोकसभा निवडणुकीपासूनच वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यातच पक्षाच्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमात दोघेही उपस्थित नसल्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...