वादग्रस्त ठिकाणी केलेली पक्की बांधकामे तोडण्यास चीनच्या सैन्याने रविवारीच सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सैन्य तुकड्या व वाहनेही माघारी घेण्यास सुरुवात केली व त्याठिकाणी ठोकलेले तंबूही काढले. सर्वात शेवटी अवजड चिलखती वाहने मागे घेण्यात आली. ...
यापूर्वी पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारीच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक झटापट झालेल्या ठिकाणावरून 1.5 किलो मीटर मागे हटले आहे. भविष्यात अशाच प्रकारची हिंसक झटापट होऊ नये, म्हणून आता या भागाला बफर झोन म्हणून घोषित करण ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ...
र्चेमध्ये ठरल्याप्रमाणे सैन्यमाघारीस लगेच सुरुवात करून ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ठरविले आहे. यानुसार वादाच्या ठिकाणांहून माघारीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचेही दोन्ही देशांनी म्हटले आहे. ...
मोदींच्या भाषणाला भारतात टाळ्या मिळून उपयोग नव्हता, चीनच्या लष्करावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्त्वाचे होते. तो परिणाम सोमवारी थोडा दिसला आहे. चीनला रोखण्यासाठी भारताने रचलेल्या तिहेरी व्यूहरचनेला किंचित यश आले असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...