चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, भारतीय सैन्याने LAC पार केली; आल्यापावली मागे जावे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 10:18 PM2020-08-31T22:18:39+5:302020-08-31T22:19:26+5:30

29-30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील पेंगाँग भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मिळालेल्या माहितीनुसार, 500 चिनी सैनिकांनी खुसखोरी करण्याचा प्रयत्न करत, आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.

China's Said, Indian troops crossed the LAC; Let's go back | चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, भारतीय सैन्याने LAC पार केली; आल्यापावली मागे जावे

चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, भारतीय सैन्याने LAC पार केली; आल्यापावली मागे जावे

googlenewsNext

लडाखमध्ये मध्यरात्री चिनी सैन्याने भारतीय हद्दीत मोठ्या संख्येने केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. गेल्या तीन महिन्यांत चीनला भारतीय जवानांनी दोनवेळा तोंडघशी पाडल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. आज या घुसखोरीचा खुलासा झाल्यावर चीनने उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. 


चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने PLA वेस्टर्न थिएटर कमांडच्या हवाल्याने म्हटले आहे की, चीन या कृत्याचा कडक शब्दांत विरोध करत आहे. भारताला त्यांचे सैन्य परत बोलावण्याचा इशारा देत आहे. त्यांनी बेकायदा एलएसी पार केली आहे. भारतीय सैन्याने दोन्ही देशांच्या बहुस्तरीय चर्चेमध्ये बनलेल्या सामंजस्याचे उल्लंघन केले आहे. सोमवारी पुन्हा वास्तविक नियंत्रण रेषा पार केली आहे. तसेच मुद्दामहून चीनला उकसविण्याचे काम केले आहे. 


चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सोमवारी सांगितले की, चीन-भारत सीमेच्या सिक्कीम सेक्शनमध्ये 1890 च्या अँग्लो-चिनी समझोत्यानुसार वारंवार भारत सरकारने आपल्याला कोणताही त्रास नसल्याचे म्हटले आहे. हा सामंजस्य करार पालन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सिद्धांत आहे. भारतीय सैन्याने सीमापार येऊन हा करार मोडला आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. 


दरम्यान, 29-30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील पेंगाँग भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मिळालेल्या माहितीनुसार, 500 चिनी सैनिकांनी खुसखोरी करण्याचा प्रयत्न करत, आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्टच्या रात्री 500 चिनी सैनिकांनी, सीमेवरील आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक येथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मात्र, यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांत कुठल्याही प्रकारची झटापट झाली नसल्याचेही समोर आले आहे. 

चिनी परराष्ट्र मंत्रालयाने घुसखोरीचा दावा फेटाळला - 
या घटनेवर चिनी परराष्ट्र मंत्रालयानेही भाष्य केले आहे. भारताने केलेला चिनी सैनिकांच्या घुसखोरीचा दावा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लवला आहे. सीमेवर असलेल्या चिनी सैनिकांनी LAC ओलांडली नाही, दोन्ही देशांत यासंदर्भात बोलणी सुरू आहे, असे चीनने म्हटले आहे.

Web Title: China's Said, Indian troops crossed the LAC; Let's go back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.