कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Katrina Kaif Shared Her Unique Style Of Applying Lipstick: कतरिना कैफने मेकअप आणि खास करून तिची लिपस्टिक लावण्याची पद्धत याविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत... (actress Katrina Kaif shared her makeup tips) ...
Katrina Kaif : कतरिना कैफने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, अनेकवेळा ती ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी निर्मात्यांची पहिली पसंती ठरली नाही. ...