कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
बिग बॉस १७(Bigg Boss 17 )च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये टायगर ३ स्टार सलमान खान कतरिना कैफच्या गाण्यावर डान्स करताना दिसला. यादरम्यान अभिनेत्रीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ...
सलमानच्या 'टायगर ३'चे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 'टायगर ३' सिनेमा पहिल्याच दिवशी 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. ...
'टाइगर ३'(Tiger 3)च्या रिलीजला आता काही तास उरले आहेत. सलमान खान(Salman Khan)चा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. ...