'नजर तेरी तुफान' मध्ये कतरिना-विजय सेतुपतिचा लिपलॉक सीन, 'मेरी ख्रिसमस'ची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:06 PM2024-01-05T12:06:14+5:302024-01-05T12:07:10+5:30

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Merry Christmas movie katrina kaif and vijay setupati liplock scene viral on internet | 'नजर तेरी तुफान' मध्ये कतरिना-विजय सेतुपतिचा लिपलॉक सीन, 'मेरी ख्रिसमस'ची उत्सुकता

'नजर तेरी तुफान' मध्ये कतरिना-विजय सेतुपतिचा लिपलॉक सीन, 'मेरी ख्रिसमस'ची उत्सुकता

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपति (Vijay Setupathi)  यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) लवकरच रिलीज होत आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. प्रेक्षकांना ट्रेलर प्रचंड आवडला आहे. तसंच कतरिना आणि विजयची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. नुकतंच सिनेमातील 'नजर तेरी तुफान' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. यामध्ये कतरिना आणि विजयचा किसींग सीन व्हायरल होतोय.

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. श्रीराम राघवन यांचाच 'अंदाधुन' सिनेमा खूप गाजला होता. त्यांचे चित्रपट कायमच काहीतरी हटके असतात. त्यामुळे 'मेरी ख्रिसमस' कडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहे. शिवाय कतरिना आणि विजय सेतुपति ही नवीनच जोडी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इतकंच नाही तर दोघांचा लिपलॉक सीनही आहे जो सध्या व्हायरल होतोय. 

'मेरी ख्रिसमस' सिनेमातील हे पहिलंच गाणं रिलीज झालं आहे. गाण्याला प्रीतमचं म्युझिक असून आणि पॅपॉनने हे गाणं गायलं आहे. १२ जानेवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिनू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे यांचीही भूमिका आहे.

विजय सेतुपतिसोबतच्या पहिल्या भेटीवर कतरिना म्हणाली,'विजयचं नाव जेव्हा मी गुगलवर सर्च केलं तेव्हा पांढरे केस पांढरी दाढी असा लूक दिसला होता. जेव्हा मी सिनेमाच्या चर्चेसाठी ऑफिसमध्ये आले तेव्हा विजय सरांना पाहून मला वाटलं ओके असे आहेत तर.' असं म्हणत कतरिना हसली.

Web Title: Merry Christmas movie katrina kaif and vijay setupati liplock scene viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.