कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी सातत्याने खालावली असून, अगदी राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या फळीतील नेतेमंडळींनीही वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका लावला आहे. ...
सतत वादग्रस्त विधाने करून कुठल्या ना कुठल्या वादाला तोंड फोडणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ...
लोकसभा निवडणूक जवळ आली असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमधील टीकाही वैयक्तिक पातळीवर पोहोचली आहे. ...
कर्नाटकमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त असले तरीही देवेगौडा यांचा जेडीएस आणि काँग्रेसने मिळून सत्ता स्थापन केली आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या येडीयुराप्पा यांनी बऱ्याचदा काँग्रेसला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले आहेत. ...
माझे सरकार उलथविण्यासाठी जनता दल (एस)च्या आमदाराला भाजपा प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी प्रलोभने दाखविल्याचा आरोप मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शुक्रवारी केला. ...
काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) आघाडीच्या कुमारस्वामी सरकारला पुरेसे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ माजविल्याने कर्नाटक विधानसभेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ...