टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 05:22 PM2019-03-06T17:22:50+5:302019-03-06T17:24:34+5:30

सतत वादग्रस्त विधाने करून कुठल्या ना कुठल्या वादाला तोंड फोडणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या हे  पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

siddaramaiah make controversial statement on Tilak | टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल

टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल

Next
ठळक मुद्देकुंकू आणि भस्माचा लांबलचक टीळा लावणाऱ्या लोकांची भीती वाटते, असे वक्तव्य सिद्धारामय्या यांनी केले या वक्तव्यानंतर सिद्धारामय्या यांच्याविरोधात सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया नेटिझन्सकडून राहुल गांधी यांचा टिळा लावलेला फोटे शेअर करण्यात येत आहे. तर काही जण स्वत:चा टिळा आणि भस्म लावलेला फोटो शेअर करत आहेत

बंगळुरू - सतत वादग्रस्त विधाने करून कुठल्या ना कुठल्या वादाला तोंड फोडणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या हे  पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ''कुंकू आणि भस्माचा लांबलचक टीळा लावणाऱ्या लोकांची भीती वाटते, असे वक्तव्य सिद्धारामय्या यांनी केले होते.'' दरम्यान, सिद्धारामय्या यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत असून, ट्विटरवर  #SelfieWithTilak चा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे. 

कर्नाटकमधील बदामी येथे एका सभेला संबोधित करताना सिद्धारामय्या यांनी हे वक्तव्य केले होते. जे लोक कुंकू किंवा भस्माचा लांबलचक टिळा लावतात. त्यांची मला खूप भीती वाटते, असे सिद्धारामय्या यांनी म्हटले होते. दरम्यान, हे वक्तव्य केल्यानंतर सिद्धारामय्या यांच्याविरोधात सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काही नेटिझन्सकडून राहुल गांधी यांचा टिळा लावलेला फोटे शेअर करण्यात येत आहे. तर काही जण स्वत:चा टिळा आणि भस्म लावलेला फोटो शेअर करत आहेत. 

दरम्यान, दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल बग्गा यांनीही सिद्धारामय्या यांच्यावर टीका केली आहे. ''कंस मालाला टिळ्याची भीती वाटते. आता आज ट्विटरला टिळ्याच्या फोटोंनी  रंगवून टाकूया, टिळा लावलेले फोटो शेअर करूया,''असे आवाहन तेजिंदरपाल बग्गा यांनी केले आहे.

 सिद्धारामय्या आणि वाद यांचे जुने नाते आहे. याआधी गेल्या महिन्यात सिद्धारामय्या हे एका महिलेला धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र नंतर हे प्रकरण मिटवण्यात आले होते.  

Web Title: siddaramaiah make controversial statement on Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.