2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
भारताचा डाव ११व्या षटकात ४ बाद ९० धावा असा घसरला होता. परंतु, मनिष - धोनी यांनी सावध सुरुवातीनंतर चौफेर फटकेबाजी करत यजमानांची धुलाई करुन भारताला आव्हानात्मक मजल मारुन दिली. ...
हेन्रिक क्लासेन (६९) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (६४*) यांनी झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुस-या टी२० सामन्यात भारताचा ६ गड्यांनी पराभव केला. ...