नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बेझनबाग येथील बंद करण्यात आलेल्या गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना महाल येथील दादासाहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात समायोजित करण्याला मान्यता देण्यात आली आहे. त्याविरुद्ध गुरुनानक जागृत पालक संघाने मुंबई उ ...
सिमेंट रोड बांधण्यासाठी पर्यावरण मंत्रालय किंवा पर्यावरणाशी संबंधित अन्य सक्षम प्राधिकरणांची परवानगी आवश्यक आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली. ...
हातणकर यांचा पहिला विवाह १९९२ आणि दुसरा विवाह १९९८ मध्ये झाला. श्रद्धाने केलेल्या याचिकेनुसार, हातणकर यांच्या दोन्ही विवाहांची हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे ...
भारद्वाज यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. भायखळा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी, आरोपी असल्याने भारद्वाज यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संक्रमणामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला. ...
शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तूरचंद पार्कची सद्यस्थिती दाखविणारी छायाचित्रे रेकॉर्डवर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ...