गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. देशभरात भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संसदेत पोहोचतात व्हिक्टरी साईन दाखवत या निकालामुळे आपण आनंदित असल्याचं दाखवून ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. आता पहिला निकालसुद्धा भाजपाच्या बाजूने लागला असून, अहमदाबादच्या एलिसब्रिज मतदारसंघातून भाजपाचे राकेश शहा 70 हजार मतांनी विजयी झाले आहे. ...
मुंबई- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सध्या सुरू आहे. सकाळपासून येत असलेल्या ट्रेण्ड्समध्ये भाजपा आघाडीवर आहे तर काँग्रेस काही जागांनी पिछाडीवर आहे. दोन्ही पक्षांमध्ये कांटेकी टक्कर बघायला मिळते आहे. निकालाचे सुरूवातीचे ट्रेण्ड्स सोशल मीडियावर ...
गुजरातेत काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना सुरु असताना मुख्यमंत्री विजय रुपानी त्यांच्या राजकोट पश्चिम मतदारसंघात तिस-या फेरीअखेर 7600 मतांनी आघाडीवर आहेत. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या 182 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. निवडणुकीचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. पण कोणालाही अपेक्षा नसताना काँग्रेस भाजपाला कडवी झुंज देताना दिसत आहे. ...