साखर आयुक्तालयाकडून आदेश आल्यानंतर सर्व निकष लावून एफआरपी वसुलीसाठी संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त करणे, कारखान्याला टाळे ठोकणे. कारखान्यातील साखर बाहेर न पाठवणे अशी कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. ...
शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू करीत राज्यातील ४३ तालुके दुष्काळी ठरविले आहे. त्यात मालेगाव तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी साडेआठ ते साडेबावीस हजार नुकसानभरपाई मिळू शकते. ...
Thane News: ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात यापूर्वीच आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार ४५ च्या आसपास आपला दवाखाना सुरु आहेत. त्यात मागील काही महिन्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून एका ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. ...
दोन महिन्यांतच गायीच्या दुधास खाजगी दूध संघाने पुन्हा २ रुपये दर कमी करून अगोदरच चारा-पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादकांमधून येत आहे. ...