जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली. ...
‘बाप्पा धाव रे पाऊस पाड रे’ अशी प्रार्थना प्रत्येक गणेशभक्त करत होता. दिवसभरात शंभरपेक्षा जास्त मंडळांनी तर शेकडो घरात श्रीं ची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र श्रीं ची स्थापना उत्साहात करण्यात आली. ...
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. अर्थात श्रीगणेश चतुर्थी. आज पार्थिव गणेश पूजन करावे, असे शास्त्रमत आहे. प्राचीन काळापासून घराघरातून या दिवशी गणेश पूजन होत आले आहे. थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांनी या उत्सवास व्यापक स्वरुप दिले. ...
अधून-मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ चा अखंड गजर करत सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत केले. ...