रोशनीसारख्या अशा अनेक गर्भवती मातांच्या नशिबी या यातना येतात. केवळ या नाल्यावर पूल असता तर रोशनी आणि तिच्यासारख्या माउलींचे हाल झाले नसते. नक्षलवादाचे कारण पुढे करून विकासाची लक्तरे वेशीवर टांगणारे अधिकारी गप्प होते आणि आहेत. ...
तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंत २३ किलोमीटरचा प्रवास पायदळ केल्यानंतर रूग्णवाहिकेने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालय गाठले आणि त्याच दिवशी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे हे दुसरे बाळंतपण होते. इतक्या लांब पायी चालून येणाऱ्या त्या गरोदर मा ...