यंदाच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. हिवाळा जेमतेम सुरु झाला असतांनाच कोका अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला. ...
तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पेरजागड येथे महाप्रसादाचा स्वयंपाक करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना याठिकाणी स्वयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. ...