रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
रशियात होत असलेल्या या फुटबॉल वर्ल्डकपसाठी तब्बल १० हजार भारतीय चाहते दाखल झाले आहेत. काही मराठी, काही उत्तर भारतीय तर काही दक्षिण भारतीयही येथे वर्ल्डकपचा थरार याची देही याची डोळा पाहणार आहेत. ...
सुमारे ८० हजार फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत लुझनिकी स्टेडियममध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन यांनी विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन केले आणि त्यानंतर यजमान रशिया विरुद्ध सौदी अरब या सामन्याने जागतिक महासंग्रामाला सुरुवात झाली. ...
रशियासाठी विश्वचषक स्पर्धेत मैदानावरची लढाई महत्त्वाची ठरणार आहे. अशी विश्वस्तरावरची स्पर्धा आयोजित करण्यामागे मूळ हेतू असतो तो त्या देशातील एकूणच खेळाची व्यवस्था सुदृढ, सशक्त बनवून त्या खेळाचा विस्तार होऊन लोकप्रियता वाढविणे हा. ...
रशियाकडून या सामन्याच्या आधी सहा सामने खेळलेल्या युरीला एकही आंतरराष्ट्रीय गोल नोंदवता आला नव्हता. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला गोल थेट विश्वचषकातच नोंदवला. ...