FIFA World Cup 2018 : कारकिर्दीतील पहिलाच गोल ' त्याने ' मारला तो विश्वचषकात

By आकाश नेवे | Published: June 14, 2018 11:14 PM2018-06-14T23:14:26+5:302018-06-14T23:14:26+5:30

रशियाकडून या सामन्याच्या आधी सहा सामने खेळलेल्या युरीला एकही आंतरराष्ट्रीय गोल नोंदवता आला नव्हता. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला गोल थेट विश्वचषकातच नोंदवला.

FIFA World Cup 2018: In the World Cup, he hits his first goal in the World Cup | FIFA World Cup 2018 : कारकिर्दीतील पहिलाच गोल ' त्याने ' मारला तो विश्वचषकात

FIFA World Cup 2018 : कारकिर्दीतील पहिलाच गोल ' त्याने ' मारला तो विश्वचषकात

Next

आकाश नेवे : फिफा विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात रशियाचा डिफेन्सिव्ह मिडफिल्डर असलेल्या युरी गॉसिन्सकी याने पहिला गोल नोंदवला. रशियाकडून या सामन्याच्या आधी सहा सामने खेळलेल्या युरीला एकही आंतरराष्ट्रीय गोल नोंदवता आला नव्हता. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला गोल थेट विश्वचषकातच नोंदवला.

सौदी अरब विरोधातील सलामीच्या सामन्यात अलेक्सांडर गोवोलीन या रशियाच्या सर्वात वेगवान आणि वैविध्यपुर्ण खेळाडूने १२ व्या मिनिटाला युरीकडे पास दिला. त्यावर युरीने हेडरवर हा गोल नोंदवला. २८ वर्षांचा युरी गॉसिन्सकी हा सध्या स्थानिक फुटबॉल क्लब क्रोसनोडरकडून खेळतो. २००७ पासून क्लब फुटबॉलमध्ये त्याने २१ गोल नोंदवले आहे.

फिफा विश्वचषकातील पहिलाच गोल आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलाच म्हणून साजरा करणारा तो बहुधा पहिलाच खेळाडू आहे.  त्याने २०१३ मध्ये क्लब क्रोसनोडरसोबत करार केला. या क्लबसोबत त्याने १२८ सामन्यात ५ गोल केले आहेत. युरी याने आतापर्यंत एकुण २६० सामन्यात १३ गोल केले आहेत. सलामीच्या सामन्यात गोल नोंदवणारा चेरीशेव ठरला पहिला बदली खेळाडू रशियाचा अर्टेम झ्युबा याला दुखापत झाल्यावर डेनिस चेरीशेव हा बदली खेळाडू म्हणून मैदानात आला. आणि त्याने ४३ व्या संघासाठी दुसरा गोल केला. या गोलसोबतच चेरीशेव हा विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात गोल नोंदवणारा पहिला बदली खेळाडू ठरला. त्यानंतर बदली खेळाडू म्हणून आलेल्या अर्टेम झ्युबा याने ७१ व्या मिनिटाला गोल केला झ्युबा याने मैदानात आल्यानंतर फक्त ८९ सेकंदातच गोल केला. विश्वचषकात बदली खेळाडू म्हणून कमी वेळेत गोल करण्याचा विक्रम पोलंडच्या मार्किन झ्युलाकोव याच्या नावावर आहे. अमेरिकेविरोधातील सामन्यात त्याने फक्त ६४ सेंकदातच गोल केला.

Web Title: FIFA World Cup 2018: In the World Cup, he hits his first goal in the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.