केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
मुंबईतील आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांसह दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. ...
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रातील शेतकरीही काल हजारोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत. राजभवणावर जाण्याची या शेतकरी आंदोलकांची इच्छा आहे. ...
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मुंबईत आज हजारो शेतकऱ्यांचा लाँग मार्च पोहोचला आहे. या मोर्चाची ही खास छायाचित्र सारंकाही सांगून जातील. ...