शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर टीका करताना काँग्रेसने आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. राहुल गांधी यांनी हिंसाचाराबाबत ट्विट करताना म्हटले की, ‘हिंसा कुठल्याही समस्येचे समाधान नाही. दुखापत कुणालाही होऊ शकते, पण नुकसान मात्र आपल्या देशाचेच होईल. देशहितासाठी कृषीविरोधी कायदे परत घ्या.’
राहुल गांधी यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले, ‘दिल्लीचे दृश्य चकित करणारे होते. काही लोकांनी केलेली हिंसा स्वीकार्य नाही. त्यामुळे शांतीपूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांनी कमावलेल्या इभ्रतीवर वाईट प्रभाव होईल. शेतकरी नेत्यांनी यापासून स्वत:ला वेगळे केले आणि ट्रॅक्टर रॅलीला वाऱ्यावर सोडले. कॅप्टन यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की दिल्ली सोडावी आणि सीमेवर आपल्या आंदोलन स्थळी पोहचावे.’
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी हिंसा चुकीची असल्याचे सांगत यासाठी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जर तिन्ही काळे कायदे परत घेतले असते तर ही घटना घडली नसती. त्यांनी तिन्ही कृषी कायदे शक्य तेवढ्या लवकर परत घेण्याचा सल्ला दिला. काँग्रेस, राकाँसह अन्य पक्षांनी हिंसाचाराचा निषेध केला, पण यासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरविले.
ममतांचा केंद्राला दोष
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी दिल्लीतील हिंसाचाराबद्दल केंद्र सरकारलाच दोष दिला. केंद्राची ताठर भूमिका आणि शेतकऱ्यांबद्दलची उदासीन वृत्ती यामुळेच हा प्रकार घडला, असे त्या म्हणाल्या. सरकारने आता त्वरित शेतकऱ्यांशी बोलणी करून नवीन कायदे मागे घ्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली.
Web Title: Congress urges farmers not to resort to violence
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.