बागलाण तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट गडद झाले आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. पावसाने दडी मारल्यास रब्बीच्या सुद्धा आशा मावळणार आहेत. या गंभीर ...
मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला. ...
नाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून पावसाकडे आशा लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांची दुबार पेरणीची संधीही संपुष्टात येण्याचे संकट घोंघावू लागले आहे. आॅगस्टच्या दुसरा आठवड्यातही वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पा ...
जिल्ह्यात १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर, दौैंड व शिरूर तालुक्याने मात्र अद्याप पावसाळा अनुभवला नाही. ...
वरुणराजाची पुन्हा एकदा अवकृपा झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळातून शेतकरी सावरत असतानाच यावर्षी दुष्काळाचे संकट दारावर येऊन उभे ठाकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके करपून जात असून ...
निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़ ...
इरई धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने महऔष्णिक विद्युत केंद्रही आॅक्सिजनवर आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे. ...