आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे सचिव सदानंद फुलझेले यांचे रविवारी सकाळी डॉ. आंबेडकर मार्ग धरमपेठ येथील राहत्या घरी निधन झाले. ...
आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला. ...
धम्मदूत भदन्त संघरत्न मानके कठोर तप करून भिक्खू झाले. त्यांनी भारतात आणि जपानमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. ते भारत-जपान यांच्यातील मैत्रीचा दुवा आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल ...
दीक्षाभूमी परिसरात उंच इमारतींचे बांधकाम व्हायला नको व अशा आराखड्यांना मंजुरी देऊ नये अशी सूचना नागपूर महानगरपालिकेला करण्यात येईल असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीच्या विकासाकरिता २८१ कोटी रुपये देण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दीक्षाभूमी विकास निधीला प्रशासकीय मान्यता देण्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला आणखी तीन आठवड्याचा वेळ वाढवून दिला. सरकारकडे २८१ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. ...