धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Maharashtra Assembly Budget Session 2025: आझमींना टार्गेट करून मुंडे, कोकाटेंना एका दिवसापुरता का होईना बाय देण्याची, तर खेळी नव्हती ना, असा प्रश्न पडल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. सोमवारी रात्री नेत्यांची दीड तास खलबते झाल्यानंतर राजीनामा देण्याचे फर्मान, मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी राजीनामा पत्र पीएच्या हातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. ...
Dhananjay Munde Resignation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. ...