धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे बाबत अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीकडून दोन महिन्याच्या आत अहवाल प्राप्त करून घेवुन मानधन वाढीबाबत निर्णय घेतला जाईल ...
राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. सेंट्रल हॉलमध्ये भाषण करत असताना राज्यपालांनी मराठीतून सुरुवात करताना सर्व सदस्यांना आनंद झाला. ...
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त पसरविणा-या भाजप सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तसेच धनंजय मुंडे युवा मंचच्या पदाधिका-यांनी जोडे मारून संताप व्यक्त केला. ...
विधान परिषदेत प्रश्न दडपण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पैसे घेतल्याच्या वृत्तावरून भाजपाच्या सदस्यांनी आज विधानसभेत प्रचंड गदारोळ केला आणि त्यात सभागृहाचे कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले. ...
मराठी भाषा दिन साजरा करीत असताना आज मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही, भाषा विभागातील 40 % पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील सचिव,आय. ए. एस., आय. पी. एस. अधिकारी मराठीत टिपणे इंग्रजीत टाकतात. ...