धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
रेल्वे जीएमशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. ...
मुंबईत येवून अचल चौरासियाला मध्यप्रदेश पोलिस अटक करतात मग महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाही. तो पोलिसांचा जावई लागला आहे का ? आपल्या गुन्हयात पोलिसांनी चौरासियाला का मागितले नाही. याचं उत्तर मंत्री देत नाहीत. ...
बीड जिल्ह्यासह संपुर्ण राज्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याच्या मुद्दाकडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत सभागृहाचे लक्ष वेधले. ...
राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणार्या स्पर्धा परिक्षेत मागील दोन-तीन वर्षांपासून बोगस (डमी ) विद्यार्थी बसवून निवड केली जात असल्याचे प्रकरण अतिशय गंभीर असून, या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुं ...
आघाडी सरकारच्या काळातील 32 लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात भर घालण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून गेल्या चार अर्थसंकल्पात सिंचनाची आकडेवारी का जाहीर केली नाही, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. ...
गेले २० दिवस औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला असून त्याचे पर्यवसन काल दंगलीमध्ये झाले. त्या घटनेवर आज विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडताना महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केली. ...
राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे बाबत अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीकडून दोन महिन्याच्या आत अहवाल प्राप्त करून घेवुन मानधन वाढीबाबत निर्णय घेतला जाईल ...