धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
राजकीय मैदानात धनंजय मुंडे आपल्या आक्रमक भाषणाच्या शैलीत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. तेच धनंजय मुंडे सोशल मिडीयाच्या माध्यमातून खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर अचूक नेम धरतात. ...
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सरू केलेली ऊसतोड महामंडळाचे काय झाले असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू घात की अपघात असा संशय सामान्य माणसाच्या मनात आहे. त्यामुळे, चौकशी करण्याबाबत मी मागणी केली तर आमच्या ब ...
वाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले. ...
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रितम मुंडे बीड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी प्रीतम मुंडे यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता परिस्थिती मात्र वेगळी आहे. धनजय मुंडे यांनी बीडमध्ये आपली पकड मजबूत ...
धनंजय मुंडे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी एखादा मोटारसायकलवाला पन्नास रुपये लिटर भावाप्रमाणे पेट्रोल भरत होता. आणि आज तोच भाव ८१ रुपये जर असेल तर मोदी साहेबांनी मोटारसायकलवाल्यांची दिवसाढवळ्या रोज ३१ रुपयांची लूट केली आहे. पावणेचारशे रुपयांचे सिलेंडर एक ...