धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Suresh Dhas meet Dhananjay Munde News: धस यांनी हो मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो, असे सांगत या भेटीमागचे कारण सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांनाही खोटे पाडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे. याचा आका हे मुंडे असल्याचे आरोप धस यांनी केले होते. तसेच मुंडे यांच्या विरोधात सातत्याने धस यांनी आवाज उठविला होता. ...
सरपंच संतोष देशमुख हत्येला दोन महिने पूर्ण, भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, अंजली दमानिया, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावे, अशाप्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करत आहेत. ...