धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यातील विस्कटलेली ‘घडी’ पूर्ववत करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. ...
राष्ट्रवादी सोडणारे बहुतांशी नेते भाजपमध्येच गेले आहेत. परंतु, पवारांनी अचाकन घेतलेला स्टॅन्ड आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मरगळ झटकून टाकणारा ठरण्याची शक्यता आहे. ...