धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
‘उडान ’योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद झाली आहे. ही सेवा नियमितपणे देण्यास अपयशी ठरलेल्या एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ‘उडान ’च्या दुसऱ्या टप्प्यामधील हैदराबाद-कोल्ह ...
एकच खासदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून शासकीय शिष्टाचाराचे पालन न करता विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीचा भूमिपूजन समारंभ घाईगडबडीत उरकून घेतल्याची टीका खासदार संभाजीराजे यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता गुरुवारी केली. ...
कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. सध्या असणारी धावपट्टी विस्तारीकरणानंतर ९३० मीटरने वाढणार आहे. नव्या धावपट्टीमुळे या विमानतळावर एटीआर आणि बोर्इंग उतरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर-तिरुपती, ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ‘बीएसएनएल’ची सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ...
राजकीय संघर्ष आणि खुन्नस यांमुळे अनेकांचे नेतृत्व कुजले, जिल्ह्याचा विकास खुंटला, याची सदोदित आठवण करून देणारा इतिहास समोर असताना, त्यातून काही शहाणपण शिकण्याची अपेक्षा असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत नव्या पिढीतील राजकारण्यांनी त्याच मार्गाने वाटचाल सु ...
केरळमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली असताना तेथे अत्यंत आवश्यक असणारे अंडरवेअर दोन ट्रक भरुन पाठविणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. ‘लोकमत’च्या १४ व्या वर्धापनदिनानिमीत्त मंगळवारी त्यांनी कोल्हापूर शहर कार्यालयास भेट देऊन सदिच्छा दिली. ...
खासदार धनंजय महाडिक यांनी इथून दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विद्यार्थ्यांशी आपुलकीने मराठी भाषेतून संवाद साधल्याने सर्वच विद्यार्थी भारावले. ...