धनंजय महाडिक यांच्या पुतळ्याचे मुरगूडात दहन- मंडलिक यांच्या टीकेला प्रत्युउत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 08:23 PM2018-10-16T20:23:34+5:302018-10-16T20:26:36+5:30

खासदार धनंजय महाडिक यांनी प्रा.संजय मंडलिक यांच्यावर खालच्या पातळीवर येवून जी टीका केली त्याचे आज मुरगूड शहरासह कागल तालुक्यात तीव्र पडसाद उमटले

Dhananjay Mahadik's statue replies to Durga Mandalik's mockery | धनंजय महाडिक यांच्या पुतळ्याचे मुरगूडात दहन- मंडलिक यांच्या टीकेला प्रत्युउत्तर

मुरगूड येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुतळ्याचे दहन करताना मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार,दत्तात्रय मंडलिक,मारूती ओतारी, संजय चौगले, सचिन भारमल, राजू महाजन, विक्रम घाटगे यांच्यासह

googlenewsNext

मुरगूड : खासदार धनंजय महाडिक यांनी प्रा.संजय मंडलिक यांच्यावर खालच्या पातळीवर येवून जी टीका केली त्याचे आज मुरगूड शहरासह कागल तालुक्यात तीव्र पडसाद उमटले.तुकाराम चौकातून रॅली काढत,निषेधाच्या घोषणा देत मुरगूड येथील एस.टी.स्टॅन्ड परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी महाडिकांच्या निषेधाच्या घोषणानी परिसर दणाणून सोडला.यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार निषेध व्यक्त करताना म्हणाले ,घराणेशाहीचे राजकारण करणा?्या महाडिकांनी निष्ठा शिकवू नये पराभव समोर दिसू लागल्याने ते खालच्या पातळीवर टीका करीत आहेत जिल्ह्यातील जनता थारा देणार नाही . कागल तालुक्याच्या स्वाभिमानाला महाडिकानी डिवचले आहे.जर हा उद्योग महाडिकानी बंद केला नाही तर त्यांना कागल तालुक्यात आपण पाय ठेवू देणार नाही प्रा मंडलिक हे सदाशिवराव मंडलिक यांच्या विचारावर राजकारण करत आहेत ते क्रियाशील आहेत.त्यांनी अनेक पदावर चांगले काम केले आहे हे जनतेला माहित आहे त्यामूळे येत्या निवडणूकीत जनता त्यांनाच स्वीकारणार आहे.

खासदार महाडिक यांच्या पुतळा दहन करताना नगराध्यक्ष राजेखान जमादार, दत्तात्रय मंडलिक,मारूती ओतारी, संजय चौगले, सचिन भारमल, राजू महाजन, विक्रम घाटगे, पीर महंमद जमादार, सम्राट मसवेकर, अमर सणगर, प्रकाश हळदकर, पांडूरंग चौगले, जोतिराम ताटे, महेश ओतारी, अभिजित कांबळे, अरूण ढोले, विनायक मंडलिक, जितेंद्र मिठारी आदि उपस्थित होते.

 

Web Title: Dhananjay Mahadik's statue replies to Durga Mandalik's mockery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.