धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
डॉ. डी.वाय. पाटील साम्राज्याचे शिलेदार बंटी उर्फ आमदार सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ खासदार धनंजय महाडीक यांच्यातील राजकीय संघर्ष टिटेला पोहचला आहे. याची साक्ष “आपल ठरलंय” ही पोस्टच देते. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी हे उद्या, गुरुवारी तर राष्ट्रवादी, कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक हे सोमवारी (दि. १) आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने ...
ज्यावेळी स्वत:ला मूल होत नाही, त्यावेळी दत्तक घेतले जाते. पाच वर्षे सत्तेत राहूनही पाळणा हलत नाही म्हटल्यावर दुसऱ्याची मुले दत्तक घेण्याची वेळ भाजपवर आली असून, आयाराम-गयारामांच्या कौतुकातच सत्तेची पाच वर्षे गेल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश ...
चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांनाच अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. गुरुवारी दुपारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ११ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्याच यादीत महाडीक यांच्या नावावर शि ...
आपण कोणाशी बोललो नाही, ज्यांचा पंतप्रधान करायचा आहे, ते बघतील. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना सांभाळतील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकारांना सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी आपण सतेज पाटील व दोन्ही कॉँग्रेसच्या ...
कोल्हापूर : माझ्याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांत गैरसमज असल्याचे जाणवते. माझ्याकडून अनवधानाने काही गोष्टी झाल्याही असतील; पण मी त्या जाणीवपूर्वक ... ...