धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. स्वत: सुळे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रतिक्रियांचा नुसता धुरळाच उडाला. ...
राज्याने दखल घ्यावी असे नेते कोल्हापूरने जरूर दिले परंतु त्यांचे स्वत:चे सुरक्षित मतदारसंघ होते व आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर जाण्यासाठी फारशी धडपड करावी लागली नाही. कोल्हापुरातून विधानसभेवरून विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून ए. वाय. ...
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मात्र ‘पी. एन. सांगतील त्यानुसार निर्णय घ्या,’ असे सांगितल्याने संचालक मंडळाने मल्टिस्टेटचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ...
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सतेज पाटील यांनी ताकदीने प्रयत्न करून विधान परिषदेची आमदारकी मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यांत ज्यांनी काँग्रेस संपवली त्यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले आहेच परंतू महाराष्ट्रात तरी या पक्षात आता कोण राहिले आहे, सारे नेते सैरावैरा पळाले असल्याची टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे महायुतीच्या प्रचारसभेत ...