दूध दरासाठी कोल्हापुरात भाजपने रोखला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 07:33 PM2020-08-01T19:33:34+5:302020-08-01T19:39:59+5:30

दूध खरेदीच्या दरात वाढीच्या मागणीसाठी शनिवारी भाजप रयत क्रांती व मित्रपक्षांतर्फे कोल्हापुरात दुपारी पुणे-बंगलोर महामार्ग रोखण्यात आला. आंदोलकांनी पंचगंगा पुलावर ठिय्या मारीत वाहतूक रोखली. यावेळी गोकुळचा दूध टँकर अडवण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली.

BJP blocked highway in Kolhapur for milk price | दूध दरासाठी कोल्हापुरात भाजपने रोखला महामार्ग

दूध दरासाठी कोल्हापुरात भाजपने रोखला महामार्ग

Next
ठळक मुद्देधनंजय महाडिक यांच्यासह कार्यकर्त्यांना अटकगोकुळ टँकर अडवण्यावरून आंदोलकांची पोलिसांबरोबर झटापट

कोल्हापूर : दूध खरेदीच्या दरात वाढीच्या मागणीसाठी शनिवारी भाजप रयत क्रांती व मित्रपक्षांतर्फे कोल्हापुरात दुपारी पुणे-बंगलोर महामार्ग रोखण्यात आला. आंदोलकांनी पंचगंगा पुलावर ठिय्या मारीत वाहतूक रोखली. यावेळी गोकुळचा दूध टँकर अडवण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये, तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी शनिवारी राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. कोल्हापुरातही या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाला.

तावडे हॉटेल येथे पंचगंगा पुलावर झालेल्या या आंदोलनावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी खासदार व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक, भाजप किसान सेलचे अध्यक्ष भगवान काटे, जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजीराव माने, रिपाइंचे उत्तम कांबळे, शहाजी कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले.

आंदोलन तीव्र करणार

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय आहे. शेतकऱ्यांना समाधानकारक दूध दर मिळायलाच हवा. तो मिळत नाही तोवर आंदोलन असेच तीव्र होत जाईल, असा इशारा धनंजय महाडिक यांनी

पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट

कोल्हापुरातील दूध दरवाढ आंदोलनात पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे ह्यगोकुळह्णचे दूध टँकर आंदोलनकर्त्यांनी अडवल्याने गोंधळ उडाला. आंदोलनावेळी झालेल्या गर्दीत कोरोनाची धास्ती हरवून गेली. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला.

मागण्या

  • म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढ मिळावी
  • गाईच्या दूधखरेदीला १० रुपये अनुदान द्यावे. दुधाला सरसकट ३० रुपये दर द्यावा.
  • दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे.

 

Web Title: BJP blocked highway in Kolhapur for milk price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.