झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. Read More