'देवमाणूस'ची डिंपल खऱ्या आयुष्यात आहे भलतीच बोल्ड; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 04:18 PM2023-12-27T16:18:53+5:302023-12-27T16:22:35+5:30

Asmita deshmukh; मालिकेत खेडेगावातील साध्याशा मुलीची भूमिका साकारणारी अस्मिता खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आणि बिनधास्त आहे.

छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे देवमाणूस. किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेली ही भूमिका छोट्या पडद्यावर विशेष गाजली.

किरण गायकवाडप्रमाणेच या मालिकेतील अन्य कलाकारही विशेष लोकप्रिय झाले. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे अस्मिता देशमुख.

मालिकेत खेडेगावातील साध्याशा मुलीची भूमिका साकारणारी अस्मिता खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आणि बिनधास्त आहे.

सोशल मीडियावर अस्मिता सक्रीय असून कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अस्मिताचा जन्म पुण्यातील देहू येथे झाला असून लहानपणापासून तिला अभिनयाची आवड आहे.

देवमाणूस मालिकेमुळे डिंपलला खरी लोकप्रियता मिळाली. यापूर्वी तिने काही शॉर्ट फिल्ममध्ये वगैरे काम केलं आहे.

सध्या अस्मिता 'तुझी माझी जोडी जमली' या सन मराठीवरील मालिकेत झळकत आहे.

सोशल मीडियावर अस्मिता चांगलीच सक्रीय आहे.