'देवमाणूस'मधील टोन्या झाला दहावी पास, मिळाले इतके टक्के; या विषयात मिळाले अव्वल गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 09:32 AM2023-06-06T09:32:11+5:302023-06-06T09:32:39+5:30

Viral Mane : 'देवमाणूस'मधील टोन्या सध्या चर्चेत आला आहे.

Tonya in 'Devmanus' got 10th pass, got good percent; Got top marks in this subject | 'देवमाणूस'मधील टोन्या झाला दहावी पास, मिळाले इतके टक्के; या विषयात मिळाले अव्वल गुण

'देवमाणूस'मधील टोन्या झाला दहावी पास, मिळाले इतके टक्के; या विषयात मिळाले अव्वल गुण

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' (Devmanus)  मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ लोटला असला तरी अद्याप या मालिकेतील पात्र आणि कथानक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या मालिकेत डॉ. अजित कुमार, डिंपल आणि तिची फॅमिली,मंगल ताई, नाम्या, चंदा आणि टोन्या यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दरम्यान या मालिकेतील टोन्या सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. टोन्याची भूमिका बालकलाकार विरल मानेनं साकारली आहे. मालिकेत ढ असणारा टोन्या खऱ्या आयुष्यात खूप हुशार आहे. तो नुकताच दहावीची परीक्षा पास झाला असून सध्या त्याची मार्कशीट व्हायरल होताना दिसत आहे.

बालकलाकार विरल माने उर्फ टोन्याला दहावीत ७८ टक्के मिळाले आहेत. त्यात विज्ञान विषयात सगळ्यात जास्त गुण मिळाले आहेत. एकूण ५०० पैकी ३९० गुण त्याला मिळाले आहेत. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. 

अशी मिळाली टोन्याची भूमिका
दरम्यान 'देवमाणूस' या मालिकेत टोन्याची भूमिका कशी मिळाली याबद्दल विरल मानेने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझा आणि अभिनयाचा संबंध डान्सच्या आवडीमुळे आला. त्यात लॉकडाऊनमध्ये सातारच्याच एका कुटुंबाकडून ऑडिशनबद्दल कळले. मी ऑडिशन दिली आणि काही दिवसांनी निवड झाल्याचा फोन आला. सेटवर मी लहान असल्यामुळे माझे खूप लाड व्हायचे.

Web Title: Tonya in 'Devmanus' got 10th pass, got good percent; Got top marks in this subject

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.