बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर आमीर खानने अखेर मौन सोडलं असून, दीपिका पदुकोन आणि संजय लिला भन्साळी यांना मिळणा-या धमक्या ही अत्यंत दुर्देवी गोष्ट असल्याचं आमीर म्हणाला आहे. ...
पद्मावती चित्रपटावरु सुरु असलेल्या वादावर बोलताना अभिनेता शाहीद कपूरने आधी चित्रपट बघा, मग बोला असं आवाहन केलं आहे. शाहीद कपूरने चित्रपटात पद्मावतीच्या पतीची म्हणजेच राजा रतन सिंगची भूमिका साकारली आहे. ...
पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने हस्तक्षेप केला नाही, तर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील सर्व चित्रपटगृह जाळून टाकतील अशी धमकी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे. ...
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमाचं प्रदर्शन अखेर पुढे ढकलण्यात आले आहे. देशभरातील राजपूत संघटनांकडून होणारा विरोध पाहता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तरीही वाद काही केल्या कमी होत नाहीय ...
राष्ट्रीय महामार्गाला लागून असणा-या आयनॉक्स ईएफ-3 चित्रपटगृहात पद्मावतीचे पोस्टर्स लावल्यामुळे क्षत्रिय समाजातील काही लोकांनी मॉलमध्ये घुसून तोडफोड केली. ...