बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
पडद्यावरची मस्तानी दीपिका पादुकोण खऱ्या आयुष्यातही किती नम्र आणि प्रेमळ आहे, याचा अनुभव नुकताच आला. सामान्य मध्यमवर्गीय घरातील आईचा दीपिकासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलंय ...
'धुरंधर'मध्ये रणीवर सिंग मुख्य भूमिकेत असून त्याने पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर हमझा अली मदारी ही भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. 'धुरंधर'च्या सक्सेसनंतर दीपिका पादुकोणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणने ८ तासांच्या शिफ्टवरुन तिचं मत व्यक्त केलं होतं. यावर रणवीरने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...