बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Blue Smart Investment: इलेक्ट्रिक राइड-हेलिंग स्टार्टअप ब्लूस्मार्टच्या सह-संस्थापकावर निधीचा अपहार केल्याचा आरोप झाल्यानंतर ही कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि सेबीच्या चौकशीच्या कक्षेत आहे. ...
Deepika Padukone And Ranbir Kapoor: संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा 'लव्ह अँड वॉर'च्या बाबतीत चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान या चित्रपटात रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण दिसणार असल्याची शक्यता आहे. ...