सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार असून सीना नदीकाठ परिसरातील गावांमधून मोटारी लावून पाणी उपसा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, सीना नदीकाठ परिसरातील सव्वाशेहून अधिक गावांमध्ये केवळ तीन तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...
भोर तालुक्यातील निरादेवघर धरणात ३९ टक्के तर भाटघर धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. सध्या पाणी सोडणे बंद केले असले तरी १० मार्चनंतर पाणी सोडायला सुरुवात होणार आहे. ...