Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
‘ढाक्कुमाकुम’चा गजर, पिपाण्या वाजवत - जल्लोष करीत निघालेली मंडळे, सलामीवेळचा थरार अशा वातावरणात मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. ...
मुंबापुरीची ओळख असलेला दहीहंडी हा सण सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच शहर-उपनगरात गोविंदांची लगबग सुरू असलेली दिसून आली. सर्वप्रथम आपल्या मंडळाच्या हंडीला सलामी दिल्यानंतर गोविंदा इतर हंड्या फोडण्यासाठी रवाना झाले. ...
हिंदी आणि मराठी गाण्यांच्या तालावर थिरकरणारी पावले, शिट्या, बजरंगबलीचा जयघोष, एकमेकांच्या हातात हात देत एकमेकांना सावरत रचले जाणारे थर; आणि सरतेशेवटी सलामी देत हंडी फोडल्याचा आनंद... ...