गुलाब हे नाव चक्रीवादळाच्या नावांच्या यादीतून घेण्यात आले आहे. ही यादी जागतिक हवामान संस्था/संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग फॉर एशिया आणि पॅसिफिक (WMO/ESCAP) पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (PTC) द्वारे तयार केली जाते. ‘गुलाब’ चक्रीवादळाला पाकिस्तानने नाव दिले आहे. गुलाब चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या कलिंगपटनम दरम्यान धडकण्याची शक्यता असून, या दरम्यान ९५ किलोमीटर प्रतितासापर्यंत वाऱ्याचा वेग अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. Read More
एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. ...
सध्या बस पुलावरुन पुढे जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, बस पुलावरून हळूवारपणे पाण्यात जाताना दिसते. त्यानंतर, पुढे जाऊन बस पलटी झाल्याचेही दिसून येते. ...
बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. ...
उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. ...
गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. ...