Cyclone Gulab : मुंबईत दिवसाच झाली रात्र, राजधानीत काळोख, मुसळधार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:37 PM2021-09-28T15:37:20+5:302021-09-28T15:50:44+5:30

गुलाब वादळाचा मुंबईलाही तडाखा बसत असल्याचे दिसते. ऑफिस, कार्यालयांसह घरातही दिवसाच दिवे लागले आहेत. अंधार पडल्याने वातावरणच बदलून गेलंय.

गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता.

सोमवारी रात्री मराठवाड्यात याचा परिणाम पाहायला मिळाला असून मराठवाड्यात मुसधार पाऊस पडला आहे. शेकडो गावात पाणी शिरले असून नद्यांना पूर आलाय.

आज 28 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार, दुपारी 2 वाजताच पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी असू शकतो.

समुद्र किनारपट्टीवर मासेमाऱ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुढील 3 दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुंबईत दिवसाच रात्र झाल्याचं दिसून आलं, रस्त्यांवरील वाहनांना दिवसाच गाडीची हेडलाईट सुरू करुन प्रवास करावा लागत आहे. आभाळात काळे ढग दाटले असून सगळीकडे अंधार पसरलाय.

गुलाब वादळाचा मुंबईलाही तडाखा बसत असल्याचे दिसते. ऑफिस, कार्यालयांसह घरातही दिवसाच दिवे लागले आहेत. अंधार पडल्याने वातावरणच बदलून गेलंय.

रस्त्यावरील वाहनांची आणि पादचाऱ्यांची प्रवास करताना मदछाक होत असून पादचारी आडोसा शोधत आहेत. तर, वाहनचालक वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.