छोट्या वासरांचा संभाळ करून ती मोठी झाल्यावर गरोदर गायीची विक्री केल्यानंतर चांगले पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी हा प्रयोग करत. मात्र, आता दुभत्या जनावरांचे बाजारभाव कमी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ...
रासायनिक खतांच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता देशभरासह राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण होत आहे. ...
वन्य प्राण्यांकडून जर पाळीव पशूवर हल्ला झाला तर विभागाकडून मिळणारी नुकसानभरपाई मिळते. मात्र केंद्र शासनाच्या एनडीएलएम या पोर्टलच्या निर्देशानुसार पशुंच्या कानाला बिल्ला (टॅग) असणे बंधनकारक आहे. ...
शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रति लिटर ५ रुपये अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडील ७९ हजार ३६२ गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर ९ कोटी ५८ लाख ५१ हजार ५० रुपये रक्कम अनुदान जमा करण्यात आले आहे. ...
तहान लागल्यावर आपण पाणी मागू शकतो, पण प्राणी तसे करू शकत नाहीत! प्राण्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता केवळ त्यांच्या आरोग्यासाठी घातकच नव्हे तर यामुळे जनावर दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. ...