lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी

दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी

To increase milk production; How many liters of water is needed to give one liter of milk | दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी

दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी

तहान लागल्यावर आपण पाणी मागू शकतो, पण प्राणी तसे करू शकत नाहीत! प्राण्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता केवळ त्यांच्या आरोग्यासाठी घातकच नव्हे तर यामुळे जनावर दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

तहान लागल्यावर आपण पाणी मागू शकतो, पण प्राणी तसे करू शकत नाहीत! प्राण्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता केवळ त्यांच्या आरोग्यासाठी घातकच नव्हे तर यामुळे जनावर दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

शेअर :

Join us
Join usNext

जनावरांच्या पोषणासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या वाढीसाठी प्रत्येक टप्प्यावर भरपूर पाणी लागते. शरीरातील अर्धी प्रथिने आणि सर्व चरबी कमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू होत नाही पण, प्राण्यांच्या शरीरातील एक दशांश पाणी कमी झाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो यावरून पाण्याचे महत्त्व लक्षात येते.

दूध देणाऱ्या प्राण्यांना जास्त पाणी लागते, कारण दुधामध्ये ८४ ते ८८% पाणी असते. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या लाळेमध्ये 'टायलीन' हे विकर नसते म्हणून अन्नपदार्थांचे पचन 'कोटी पोटामध्ये' (Rumen) सूक्ष्म जीवांच्या मदतीने किण्वन प्रक्रियेने केले जाते. त्यासाठी मोठ्याप्रमाणावर लाळेचा स्त्राव होणे गरजेचे असते.

अन्नपदार्थांचे किण्वन, पचन, आणि शोषण सुरळीत होण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता आहे. तहान लागल्यावर आपण पाणी मागू शकतो, पण प्राणी तसे करू शकत नाहीत! प्राण्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता केवळ त्यांच्या आरोग्यासाठी घातकच नव्हे तर यामुळे जनावर दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

जनावरांच्या शरीर रचनेत पाण्याची भूमिका
-
अन्न पचण्यास मदत होते टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन होण्यास मदत होते.
शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
उष्णतेच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते
- अॅसिडिटीची पातळी नियंत्रित राहते.

पाण्याची उपयुक्तता/परिणामकारकता
- एका दुभत्या प्रौढ म्हशीला ६० ते ६५ लिटर पाणी प्रति दिवस व दुभत्या प्रौढ गाईला ४० ते ४५ लिटर पाणी प्रति दिवस फक्त पिण्यासाठी आवश्यक असते.
- दुभत्या जनावरांना एक लिटर दूध देण्यासाठी ३-५ लिटर पाणी लागते.
- त्यांना ताप किंवा अतिसार होत असल्यास किंवा हवामान खूप गरम असल्यास त्यांना अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते.
- तसेच त्यांचे आरोग्य सुधारते आणि दुग्धोत्पादनात लक्षणीय वाढ होते.

पाण्याची गुणवत्ता आणि त्याचे प्राण्यांवर होणारे परिणाम
-
जर पाणी चवीला चांगले असेल आणि आरामदायक तापमान असेल म्हणजे, खूप गरम किंवा थंड नसेल तर प्राणी ते अधिक पितात. 
- एका अनुमानानुसार, जेव्हा पाण्याचे तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे असते तेव्हा ते अधिक पाणी पितात. माणसांइतकेच स्वच्छ पाणी प्राण्यांना लागते.
- जर तुम्ही त्यांना शुद्ध आणि जंतूमुक्त पाणी दिले तर ते निरोगी राहतात आणि अधिक दूध तयार करतात.
- अंतर्गत जंत, विशेषतः यकृतामध्ये दिसणारे, अशुद्ध पाण्यामुळे तयार होतात.
- या कृमींमुळे जनावरे त्यांचे खाद्य नीट पचवू शकत नाहीत आणि त्यांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

शुद्ध पाण्याचे चांगले प्रमाण म्हणजे अधिक दूध
-
बांधलेल्या जनावरांना दिवसातून किमान ४ ते ५ वेळा पाणी द्यावे किंवा त्यांच्याजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवावे.
- पाणवठे नेहमी स्वच्छ असले पाहिजेत.
- त्यांना आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास त्यांचे खाद्य पूर्णपणे पचत नाही.
- त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दूध उत्पादनात घट होते.

हे लक्षात ठेवा
-
जनावरांसाठी पाणी सतत उपलब्ध असावे.
- त्यांना नेहमी शुद्ध आणि ताजे पाणी द्यावे.
- पाणवठे रोज स्वच्छ करावेत.
- दोन महिन्यातून एकदा चुनखडीने गोठ्याला पांढरा रंग द्यावा.
- पाण्याचे तापमान वातावरणानुसार ठेवावे.
- जनावरांना एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यास त्यांना उन्हाळ्यात दिवसातून ५ वेळा आणि हिवाळ्यात दिवसातून किमान ३ वेळा पाणी द्यावे.
- जनावरांना दूध काढल्यानंतर पाणी दिले पाहिजे कारण जनावरांना त्यांच्या दैनंदिन वापरापैकी एक तृतीयांश पाणी दूध दिल्यानंतर आवश्यक असते.
- आहारात पोषण व्यवस्था कितीही समृद्ध असली तरी, जनावरांना भरपूर पाणी न दिल्यास खाद्य प्रभावी ठरू शकत नाही.

Web Title: To increase milk production; How many liters of water is needed to give one liter of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.