पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर मागील वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता आगामी हंगामाचे वेध लागले असून नगदी पीक असल्याने शेतकºयांचा कल पुन्हा कपाशीकडेच असल्याचे दिसत आहे. ...
बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे. ...
देशभरातील उत्पादनात ६ टक्के वाढीचा अंदाज असताना राज्यातील कापूस उत्पादनात ६.८१ टक्के घट होत आहे. कापूस उत्पादनात गुजरात महाराष्ट्राला मागे टाकत मोठी बाजी मारेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने व्यक्त केला आहे. ...
बीड जिल्ह्यात यंदा दुष्काळ नसताना देखील शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे देशोधडीला लागला आहे. हे अनुदान खरीप हंगामापूर्वी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मागील काही वर्षांपासून सातत्याने कापसाचे क्षेत्र घटत चालले आहे. आता पुन्हा त्यात तब्बल २0 टक्क्यांची घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे हळद, कारळे आदी पिकांकडेही शेतकरी पाठ फिरवतील, असा अंदाज आहे. ...