कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
अठरा वर्षांवरील कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोहिमेला १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर या लसीकरणाविषयी लाभार्थींमध्ये फारशी उत्सुकता नसल्याचे वैद्यकीय वर्तुळातील निरीक्षण आहे. ...
राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण अहवालातील निरीक्षणानुसार, या वयोगटात २,४७,७५७ लहानग्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर या वयोगटात पहिल्या लाटेत ९७, दुसऱ्या लाटेत ११७ आणि तिसऱ्या लाटेत १८ बळींची नोंद झाली आहे. ...
शुक्रवारी दिल्लीत ३२५ कोरोनाबाधित आढळले होते. शनिवारी ही संख्या ३६६ वर पोहोचली आहे. शुक्रवारचा संक्रमणाचा दर २.३९ टक्के होता. तो शनिवारी ३.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत (शुक्रवारी) भारतात 949 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. यामुळे आता, भारतातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 11,191 वर पोहोचली आहे. ...