देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
MHT-CET Exam: अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये २० ते २५ प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान न करता त्यांना या प्रश्ना ...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याच्या मुद्द्यावर वेगवेगळे मत मांडले. वडेट्टीवारांच्या याच विधानावर बोट ठेवत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...
Pahalgam Terror Attack: राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘’धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’ असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला आहे. ...