देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यांनी १०० विधानसभा जागांचे उदाहरण दिले. आता त्यांनी याला डेटाचे चुकीचे विश्लेषण म्हटले आहे. ...
Uttarakhand Assembly News: उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज कामकाजाच्या सुरुवातीलाच जोरदार गोंधळ झाला. कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...
पहलगाम हल्ल्यानंतर 'सिंधू जल' करार चर्चेत आला. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर सिंधू जल करार रद्द केला. यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. ...
यासंदर्भात आज दुपारी १२:३० वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाऊ शकते. ...
१८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आले होते, आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही असं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी म्हटलं. ...