देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा काँग्रेसनं दमदार कामगिरी केली असून यावेळी त्यांच्या जागांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. तर भाजपाला जवळपास २०१ जागांवर पराभव सहन करावा लागला. ...
loksabha Election Result - यंदाच्या लोकसभेत असे अनेक छोटे पक्ष होते, ज्यांनी ना एनडीएला पाठिंबा दिला, ना इंडिया आघाडीत सहभागी झाले. या पक्षांमुळे इंडिया आघाडीचं मात्र ९ जागांवर नुकसान झालं. ...
शनिवारी काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठक पार पडल्या. या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ...
लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे. आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा विश्वासही चेन्नीथला यांनी व्यक्त केला. ...
कार्यकर्त्यांची मेहनत आणि शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्ग, मागासवर्ग समाज अशा सर्वांनी पक्षाला भरभरून मतदान केल्याने पक्षाला पुन्हा ‘अच्छे दिन’ आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात योगेंद्र यादव यांनी दिलेला अंदाज जवळपास खरा निघाला. आता महाराष्ट्राच्या विधानसभेबाबत योगेंद्र यादव यांनी भाष्य केले आहे. ...
loksabha election Result - लोकसभेत विजय मिळवणाऱ्या १४ खासदारांच्या सत्कार कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ज्येष्ठ नेत्यांनी कौतुक केले. ...